सदाबहार फाउंडेशनमध्ये आपले स्वागत आहे.
कृपया प्रतीक्षा करा !!

संपर्काची माहिती

नवीनतम ऑफर, सामाजिक कार्य, प्रेरणादायी कथा,नोकऱ्या,कारकिर्दीमध्ये वाढ ,नवीन व्यवसाय सुरू करणे, महिला कल्याण इत्यादी जाणून घेण्यासाठी आमच्या फाऊंडेशनची सदस्यता घ्या.

बँकेचा तपशील

आपण कोठूनही संस्थेच्या माध्यमातून सेवाकार्य करू शकता. आम्ही आपल्याबरोबरच आहोत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.पुणे

अ.नं.037001600000174

बँक IFS CODE-HDFCOCPDCCB
MICRCODE-411174021 .

020-27373575

sadabaharfoundation.com

शॉप नंबर 8, विश्वकमल कॉम्प्लेक्स, थरमॅक्स चौक, चिंचवड, पुणे

आम्ही नेहमीच इथे आहोत

सदाबहार फाउंडेशन (एनजीओ) (महा/852/2017 पुणे)

नमस्कार,
         आपल्या परिसरातील सर्व बंधु व भगिनींना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे कि आपल्या भागात "सदाबहार सोशल फाउंडेशन" सामाजिक, कौटुंबिक, आनंदी जिव्हाळा निर्माण करणारी संस्था स्थापन केलेली आहे.
         सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्ती कामाचा व्याप, संसारीक जबाबदारी, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्स अॅप मुळे माणसाला माणूस भेटेनासा झाला आहे व एकलकोंडा होत आहे आणि डिप्रेशन येवून व्यसनाधीन होत आहे, व नैराश्यामुळे अनेक मानसिक आजारांच्या विळख्यात सापडला आहे व सामाजिक समतोल बिघडत चालला आहे.
         आपले सुखदुःख कोणालाही शेअर करू शकत नाही कारण विश्वासू प्रेमाची व्यक्ती भेटत नाही. दुःखाचा बोजा घेऊन चालला /चालली आहे. नातेवाईक इच्छा असूनही वेळेअभावी मदत करू शकत नाहीत. मित्रच आपल्या अडीअडचणीला आपल्या पाठीशी उभे राहतात.
         तरुणांना जेष्ठांकडून अनुभवाचा खूप फायदा होईल. तसेच जेष्ठांना तरुणांकडून नवनवीन माहिती मिळावी व सामाजिक जिव्हाळा तसेच आनंदी सुदृढ कुटुंब व्यवस्था करण्यासाठी "सदाबहार सोशल फाउंडेशन" (NGO) ची स्थापना केली आहे. गरजू, इच्छुक व्यक्तीने संपर्क साधावा.

शैक्षणिक


१. शिक्षणाचा प्रसार व प्रचार करणे, बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक,सी.बी.एस.ई पॅटर्न,इंग्रजी व मराठी माध्यम महाविद्यालय,डी.एड, बी.एड,नाईट स्कुल व महाविद्यालय, अभियांत्रिकी पदवी, पदविका अभ्यासक्रम,वैद्यकीय महाविद्यालये, पॅरामेडीकल,मेडीकल अभ्यासक्रम, व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रम व इतर शैक्षणिक क्षेत्रातील संस्था सुरु करणे, आयुर्वेदिक नर्सरी चालू करणे.

२. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अनाथ व गोरगरिबांच्या मुलामुलींसाठी मदत करणे, विविध शिष्यवृत्या देणे, पुस्तकपेढी व शैक्षणिक गोष्टींची सोय करून त्यांना मोफत पुस्तके व शालोपयोगी वस्तू पुरवणे.

३. साक्षरता अभियानाचा प्रचार व प्रसार करणे. विविध ठिकाणी प्रौढ साक्षरतेचे वर्ग चालवणे.

४. टेक्निकल स्कुल चालू करणे, तसेच विविध विषयांवरील इंजिनिअरींग कॉलेज सुरु करणे, सुरु असलेल्या कॉलेजेसना संलग्नता देणे, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हील व इतर विषयांवर संशोधन व विकास साधणे, विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे

वैद्यकीय


१. आरोग्यविषयक विविध कार्यक्रमाबाबत माहिती देणे.

२. एड्सविषयी विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करणे. लहान बालकांसाठी आरोग्य विषयक, पोलिओ डोस आदी शिबिरांचे आयोजन करणे.

३. नैसर्गिक आपत्तीचेवेळी म्हणजेच भूकंप, पूर, दुष्काळाच्यावेळी त्वरीत मदत कार्य सुरु करणे, आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी याकरिता योजनात्मक प्रयत्न करणे.

४. रक्तदान शिबीर, कुटुंब नियोजन शिबीर आयोजित करणे.

५. परिसरातील डॉक्टरांची नामावली तयार करून गरजूंना सेवा उपलब्ध करून देणे.

६. गरीब व गरजू लोकांसाठी वैद्यकीय मदत करणे, वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे, तसेच संस्थेच्या माध्यमातून फिरते हॉस्पिटल, तसेच सार्वजनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, तसेच औषधांवर संशोधन साधण्यासाठी संशोधन केंद्र स्थापन करणे, मॅटर्निटी होम, नर्सिंग होम, मुलांचे हॉस्पिटल, ब्लड बँक, तसेच खेड्यामध्ये जाऊन वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे व वैद्यकीय सेवा पुरवणे.

सामाजिक


१. गणेशोत्सव, हनुमान जयंती, दहीहंडी, नवरात्र महोत्सव, ईद इ. सण साजरे करणे.

२. महिलांना मार्गदर्शन करणे, तसेच त्यांना पापड, लोणची, मसाला, मेणबत्ती, राखी, उदबत्ती, फाईल, फॅन्सी ड्रेस, फॅन्सी बॅग, प्लास्टिक मोल्डिंग संबंधी प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करणे.

३. पर्यावरणविषयक संरक्षण व प्राणी संवर्धनात्मक कार्यक्रम बाबत माहिती देणे.

४. अस्पृश्यता निवारणात्मक कार्यक्रमाबाबत माहिती देणे व त्यातून त्यांचा सर्वांगीण विकास करणे, अंध, अपंग, मतिमंद व मूकबधिरांचे विकासात्मक व पुनर्वसनात्मक विविध उपक्रम बाबत माहिती देणे.

एक पाऊल स्वच्छतेकडे... स्वच्छ भारत


स्वच्छ भारत अभियान ही स्वच्छता मोहिम आहे ज्याद्वारे रस्त्यांची आणि इतर पायाभूत सुविधांची स्वच्छता करण्यासाठी भारतातील 4,041 वैधानिक गावे आणि शहरे जोडणे अपेक्षित आहे.

आमची संस्था या अभियानयाद्वारे प्रत्येक महिन्यात शहराला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी पुढाकार घेते.त्याच दिवशी आम्ही सर्वजण वृक्षारोपण करतो..

महात्मा गांधीजींची १५० वी जयंती म्हणजेच २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण भारत देश स्वच्छ करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून स्वच्छ भारत अभियान सुरु करण्यात आले होते. तर आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी आपले योगदान करण्यासाठी आमच्यासोबत सहभागी व्हा.

आमच्या सेवा आणि वस्तुस्थिती

आमच्याबद्दल जाणून घेण्याची उत्तम संधी

  सेवा
 • सामाजिक कार्य

 • प्रेरणादायी भाषणे

 • आनंदी क्लब

 • वैवाहिक संबंध

 • कला आणि छंद

 • कौटुंबिक समस्या

 • प्लेसमेंट कन्सल्टन्सी

 • व्यक्तिमत्व विकास

preview-image
  कार्य
 • विनामूल्य सल्ला

 • दिंडी वारकरी सेवा

 • वाढदिवस आणि एकत्र मेळावे

 • पुरुष आणि स्त्रियांना वेगळे विभाग

 • सदस्यत्व सुविधा

 • जेष्ठ नागरिक सेवा

 • योगा

 • ध्यान सल्ला

छायाचित्रे

आमचे अविस्मरणीय क्षण

आगामी कार्यक्रम

विविध कार्यक्रमांद्वारे पसरवलेला आनंद

सदाबहार उदघाटन सोहळा ...

सदाबहार फाऊंडेशन उद्घाटन समारंभ- आमच्या विशेष अतिथींचा सत्कार. आम्ही सदाबहारचा अभिमानास्पद संघ आहोत.

विठ्ठल दिंडी सोहळा ...

दरवर्षी पंढरपूरला विठ्ठल भेट देणाऱ्या भाविकांचा आदर आणि सन्मान केला जातो. यावर्षी आषाढी एकादशी १५ जुलैला होती

एक पाऊल स्वच्छतेकडे...

देवाच्या पवित्रतेच्या पुढे स्वच्छता आहे या विचाराने आम्ही सदाबहारद्वारे जागरुकता निर्माण करणारी स्वच्छता मोहीम आयोजित केली

आमच्याशी संपर्क साधा

आमच्याबद्दल जाणून घेण्याची उत्तम संधी

नाव

दूरध्वनी

ईमेल

संदेश